Skip links

व्होडाफोन अवघ्या ७ रुपयात देणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा


मुबंई : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने एंट्री केल्यापासून आता इतर टेलिकॉम कंपन्याही दररोज नवनवे टेरिफ प्लॅन आणत आहेत. यात आता व्होडाफोनने देखील सुपर हावर (Super Hour) हा नवा टेरिफ प्लॅन आणला आहे. प्रीपेड यूजर्सला या प्लॅनमध्ये ७ रुपयांपासून पुढे रिचार्ज करता येणार आहे. तर पोस्टपेड यूजर्सला या प्लॅनसाठी USSD कोड डायल करावा लागेल. हा प्लॅन यूजर्स कधीही घेऊ शकतात.

व्होडाफोन टू व्होडाफोन फ्री कॉल, लोकल कॉल आणि एक तासासाठी ४जी/३जी अनलिमिटेड डेटा या प्लॅनमध्ये यूजर्सला मिळणार आहे. एकपेक्षा अधिक वेळेसही हा प्लॅन वापरता येणार आहे. पण ही स्कीम अनलिमिटेड डेटा पॅक यूजर्ससाठी उपलब्ध नसेल.

Web Title: Vodafone offers unlimited calling and data at just Rs 7