‘या’ चित्रपटाचा विक्रम तोडण्यात ‘बाहुबली’ अपयशी


कमाईचा नवा उच्चांक प्रस्थापित करणारा ‘बाहुबली’ हा चित्रपट बॉलिवूडमधील एका चित्रपटाचा विक्रम तोडण्यात अपयशी ठरला आहे. ‘बाहुबली’ हा चित्रपट बॉलिवूड चित्रपटांमधील सुपरहीट चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. सर्वच प्रेक्षकांना या चित्रपटाने याड लावले होते. पण ‘बाहुबली’ चित्रपटाला एका बॉलिवूड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडता आला नाही हे तुम्हाला माहिती आहे का?

‘जय संतोषी मॉ’ बॉलिवूडमधील सुपरहीट चित्रपटांपैकी एक चित्रपट होता. २०१७ साली रिलीज झालेल्या ‘बाहुबली’ चित्रपटासोबत या चित्रपटाची तुलना केली तर तुम्हाला कळेल की ‘जय संतोषी मॉ’ या चित्रपटाची कमाई बाहुबली चित्रपटापेक्षा कित्येक पटीने अधिक होती.

सेन्सॉर बोर्डाने नुकतेच लवकरच रिलीज होणार असलेल्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटातील ४८ दृश्यावर कात्री चालवली आहे. अभिनेत्री बिदिता बाग हिला याचसंदर्भात विचारल्यावर ती म्हणाली की, आजच्या काळात ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटासारखे चित्रपटा बनल्यास कोण पाहणार, पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ‘जय संतोषी मॉ’ हा बॉलिवूडमधील असा एक चित्रपट आहे ज्याचा रेकॉर्ड अद्याप कुठलाही चित्रपटाने तोडलेला नाही. बजेटपेक्षा १०० पटींने अधिक केली होती कमाई

आपल्या बजेटपेक्षा ‘जय संतोषी मॉ’ चित्रपटाने १०० पटींने अधिक कमाई केली होती. आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स ‘बाहुबली’ चित्रपटाने केले आहेत. पण १९७५ साली रिलीज झालेल्या ‘जय संतोषी मॉ’ चित्रपटाचा रेकॉर्ड तोडता आलेला नाही. आपल्या बजेटपेक्षा १०० पटींने अधिक कमाई केली ‘जय संतोषी मॉ’ चित्रपटाने होती आणि बाहुबली या चित्रपटाला ते करता आलेला नाही. अवघ्या ५ लाख रुपयात ‘जय संतोषी मॉ’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती आणि या चित्रपटाने त्याकाळी ५ कोटी रुपयांची कमाई केली होती.