चक्क कार उलटी चालवत मराठा क्रांती मूक मोर्चात पोहोचला आहे ‘हा’ तरुण


मुंबई – मुंबईत आज विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून लाखोंच्या संख्येने मराठा समाज या मोर्च्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. पण यात विशेष म्हणजे एक तरूण चक्क कार उलटी (रिव्हर्स)चालवत या मोर्चात सहभागी होण्यासाठी पोहचला आहे.

या तरुणाचे नाव संतोष राजेशिर्के असे असून तो मुळचा पुणे जिल्ह्यातील आहे. हा तरुण भोर ते मुंबईपर्यंत कार उलटी (रिव्हर्स) चालवत मराठा क्रांती मूक मोर्चासाठी दाखल झाला आहे. या तरुणाच्या थरारक प्रवासाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या दरम्यान त्याच्या कारच्या मागे आणि पुढे दोन बुलेट धावत आहेत. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा देत या तरुणाला वाटेतील नागरिक प्रोत्साहन देत आहेत.