बॉडीगार्डसोबत होते डायनाचे गैर संबंध, नवऱ्याचे ‘लफडे’ ऐकले होते


ब्रिटिश प्रिन्सेस डायना यांच्या संदर्भातील नवीन चित्रफीत समोर आली असून यात डायनाच्या बाबतीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. डायना हिचे तिच्या अंगरक्षकासोबत गैर संबंध होते तसेच पती चार्ल्स याचे फोनवरील बोलणेही ऐकले होते, असे या टेपमध्ये दिसते.

डायनाची ही मुलाखत 1992-1993 साली घेण्यात आली होती. या मुलाखतीचे प्रसारण अमेरिकेत 2004 मध्ये झाले होते. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र अलीकडेच 6 ऑगस्ट रोजी चॅनल फोर (4) या वाहिनीवर ती प्रसारित करण्यात आली.

या मुलाखतीत राजकुमारी डायनाने पती प्रिन्स चार्ल्स यांचे कॅमिला पार्कर बोल्स हिच्याशी असलेल्या लफड्याबाबत वाच्यता केली आहे. प्रिन्स चार्ल्‍स टॉयलेटमध्ये बसून कॅमिलाशी खासगी बोलत असत. त्यांच्यातील हे संभाषण मी अनेकवेळा ऐकले होते आणि त्यांच्या संबंधांची मला माहिती होती, असे डायनाने म्हटले आहे.

आपला अंगरक्षक बॅरी मॅनकी याच्यावर माझे खूप प्रेम होते आणि त्याच्यासोबत पळून जाण्याची माझी इच्छा होती, असे डायनाने या मुलाखतीत स्वीकार केले आहे. सर्व काही सोडून त्याच्यासोबत जाण्याबाबत आणि राहण्याबाबत मी अत्यंत खुश होते. मी आगीशी खेळ करायला नको होता, तो मी केला आणि त्यात जळाले,” असे डायनाने म्हटले आहे.