Skip links

बद्धकोष्ठाचा त्रास असणाऱ्यांनी करावे या गोष्टींचे सेवन


बद्ध कोष्ठाचा त्रास ज्या व्यक्तींना आहे त्यांना पोटदुखी, अस्वस्थपणा, शरीर जड झाल्यासारखे वाटणे असल्या तक्रारींना नेहमी सामोरे जावे लागते. हा त्रास जर वाढीस लागला तर पुढे पचनाचे विकार सुरु होण्याची शक्यता असते. जर बद्ध कोष्ठाचा त्रास जाणवत असेल तर आपल्या आहारामधील फायबरच्या मात्रेमध्ये वाढ गरजेची आहे हे ओळखून त्या अनुषंगाने आपल्या आहारामध्ये बदल करून काही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा.

सफरचंद, नाशपाती किंवा आलुबुखारा यांसारख्या फळांमध्ये फायबरची मात्र मोठ्या प्रमाणात असते. कुठली ही सालांसकट खाल्ली जाऊ शकणारी फळे आपल्या आहारात समाविष्ट करावीत.

सुका मेवा : सुक्या मेव्यामध्ये कॅलरीज चे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणात सुका मेवा खाऊ नये. अक्रोड, बदाम, पिस्ते इत्यादी सुक्या मेव्याचा आपल्या आहारात माफक समावेश करावा.

धान्य : आपल्या आहारामध्ये ओट्स, ब्राऊन राईस अश्या पदार्थांचा समावेश करावा. त्याच बरोबर साजूक तुपाचा समावेशही आपल्या आहारात असणे आवश्यक आहे.

पालेभाजांचे सेवन जरूर करावे. पालेभाज्यांमध्ये प्रथिने, क्षार यांबरोबरच फायबरही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बद्ध कोष्ठाचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात. तसेच खजुराचा ही आपल्या आहारामध्ये समावेश अवश्य करावा.
आपल्या शरीराची पचन क्रीया सुरळीत राखण्यासाठी दिवसाला साधारण आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. विशेष करून ज्यांना बद्ध कोष्ठाचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

Web Title: Consumed by those who are tied with Constipation