सौदी आता वाळवंटातून मिळविणार पैसे


गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ तेलावर ज्या देशाची अर्थव्यवस्था पोसली केली नव्हे भरभराटीसही आली त्या सौदी अरेबियाने आता त्यांचे तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलांच्या किमतीत होत असलेली घसरण, वाहन उद्योगांनी इलेक्ट्रीक वाहनांकडे वळविलेला मोर्चा व उर्जेसाठी अन्य पर्याय शोधण्याचे जगातील सर्व देश करत असलेले प्रयत्न यामुळे तेलाच्या मागणीत झालेली घट सौदीसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. अशा परिस्थितीत सौदीने आपले उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी देशातील अन्य नैसर्गिक स्त्रोतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आहे ते सौदीचे वाळवंट

हजारो मैलांचे वाळवंट असलेल्या सौदीने आता याच वाळवंटात नवीन अत्याधुनिक शहरे वसविण्याची मोहिम हाती घेतली असून त्यामुळे रोजगार निर्मिती होईलच पण सौदीकडे अन्य देशांकडून गुंतवणुकीचा ओघ ही वाढणार आहे. सौदी व्हीजन २०३० नुसार ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे.


सौदीतील महत्त्वाच्या रेड सीचा यात मोठा सहभाग असून याच्या किनार्‍यावरील ५० बेटांचा विकास ग्लोबल टुरिझम हब म्हणून केला जात आहे. ३४ हजार किमी चा हा परिसर धनाढ्य पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. तसेच अल फैसलिया या पवित्र स्थळ मक्केजवळील नियोजित शहरात पाश्चिमात्यांसाठी निवासी योजना राबविली जाणार आहे. त्यात मनोरंजन केंद्रे, एअरपोर्ट, बंदर यांचा समावेश असेल.


सौदीत रूढीवादी समाजाच्या मनोधारणेत बदल व्हावा यासाठी एंटरटेनमेंट सिटी वसविली जात असून येथे कॉन्सर्ट हॉल, डान्स, फिल्म स्क्रिनिंग अश्या विविध मनोरंजनाच्या गोष्टी उपलब्ध केल्या जात आहेत. सौदीतील प्रत्येक कुटुंबाने त्यांचा मनोरंजावरील खर्च दुप्पट करावा असा जाणीवपूर्व प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी सौदीतील रूढ नियम बदलले जात आहेत रियाध जवळ या अल किदिया शहराची स्थापना करण्याचे काम सुरू आहे.


किंग अब्दुल्ला इकॉनॉमिक सिटी ही पहिली फ्री होल्ड सिटी येथे आकारास येत आहे.येथे डीप सी पोर्ट, लॉजिस्टीक क्लब, रिक्रिएशन सेंटर बरोबरच ६५०० निवासी मालमत्ता बांधल्या जात आहेत. त्याच धर्तीवर फायनान्शियल सिटीही उभारली जात आहे.या शहराच्या स्थापनेतून दुबईतील आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटरशी स्पर्धा केली जाणार आहे.

नॉलेज इकॉनोमिक सिटी ही मदिनातील पहिली स्मार्टसिटी असेल. येथे नॉलेजवर आधारित उद्योग, मेडिकल, हॉस्पिटॅलिटी, टूरिझम, मल्टीमिडीया हब बनविले जात आहे.

Leave a Comment