Skip links

पाचशेची नवी नोट आली


गत वर्षी नोव्हेंबरच्या नोटबंदी नंतर रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ५०० रूपयांच्या नोटांची नवी सिरीज चलनात आणली गेली असून या नव्या नोटा सध्याच्या चलनातील नोटांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. म.गांधी सिरीजमधील या नव्या नोटांत फार बदल केला गेलेला नाही मात्र नंबर पॅनल मध्ये इंग्रजी ए हे अक्षर सामील केले गेले आहे. या नोटांवर गर्व्हनर उर्जित पटेल यांची सही आहे तसेच मागच्या बाजूला २०१७ हे वर्ष छापले गेले आहे.

नव्या नोटा जारी झाल्या असल्या तरी जुन्या म्हणजे नोटबंदी नंतर चलनात आणल्या गेलेल्या ५०० रूपयांच्या नोटाही वैध असल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट केले गेले आहे.

Web Title: RBI launches new 500 ru. note