नवी दिल्ली – विस्तारा या विमान कंपनीने प्रवाशांना स्वस्त हवाई प्रवास करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. ‘फ्रीडम टू फ्लाय’ या स्कीम अंतर्गत स्वस्त विमान प्रवास करण्याची ऑफर विस्तारा कंपनीने प्रवाशांना दिली आहे.
केवळ ७९९ रुपयांत करा हवाई प्रवास
प्रवाशांसाठी टाटा-एसआयए यांच्या संयुक्त भागीदारीतून आकाराला आलेल्या विस्तारा या विमान कंपनीने खास ऑफर उपलब्ध करुन दिली असून या ऑफरनुसार, इकॉनॉमी क्लासचे तिकीट ७९९ रुपये तर, प्रिमियम इकॉनॉमी वर्गाचे तिकीट २,०९९ रुपये आहे. पण तिकीट बुकींग करण्याची ही ऑफर केवळ ४८ तासांसाठीच उपलब्ध आहे.
सोमवारी रात्री १२ वाजून १ मिनिटांपासून ‘फ्रीडम टू फ्लाय’ ही ऑफर बुकींग सुरु झाली असून ९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ही बुकींग सुरु राहील. बुकींग केलेल्या या तिकीटाच्या माध्यमातून २३ ऑगस्ट २०१७ ते १९ एप्रिल २०१८ पर्यंत तुम्ही प्रवास करु शकता.
गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवाहाटी, अमृतसर आणि भुवनेश्वर या पर्यटनस्थळी ‘फ्रीडम टू फ्लाय’ या ऑफरमुळे प्रवाशांना जाण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या ऑफर अंतर्गत दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांचा सुद्धा प्रवास करता येणार आहे.