जयपुरच्या मणिपाल युनिव्हर्सिटीत यंत्रमानव करणार समुपदेशन


जयपूर: मणिपाल युनिव्हर्सिटी जयपूर (एमयूजे)मधील सहाय्यक प्राध्यापक पीयूष गर्ग आणि एक विद्यार्थी अंशुमन कम्बोज यांनी मिळून मणिपाल इन्फॉर्मल रोबोट मायक्रोचे संशोधन केले असून हा रोबोट येथे समुपदेशनचे काम करणार आहे. त्यामुळे असे करणारी मणिपाल युनिव्हर्सिटी जयपूर ही देशातील देशातील पहिली युनिव्हर्सिटी बनली आहे.

ज्या लोकांना या युनिव्हर्सिटीबाबत माहिती असेल अशा प्रत्येकाला हा यंत्रमानव मदत करणार आहे. या रोबोटकडे युनिव्हर्सिटीबद्धलची इतंभूत माहिती उपलब्ध असेल. हा रोबोट २४ तासात ३ लोकांचे समुपदेशन करेल. १५ दिवसांचा कालावधी या रोबोटची निर्मिती करण्यासाठी लागला. युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्याने लावलेल्या या शोधाबाबत बोलताना एमयुजेचे प्रमुख प्रो. के. रामणारायण तसेच, प्रो संदीप संचेती यांनी प्रा. पीयूष गर्ग यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

माणसाचा आवाज ओळखून आपल्या चेहऱ्याच्या माध्यमातून हा रोबोट मणिपाल युनिव्हर्सिटीबाबतची सर्व माहिती आवाजाच्या माध्यमातून देणार आहे. पीयूश गर्ग आणि अंशुमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवाज ओळखून माहिती देण्यासाठी एक कार्यप्रणाली विकसित करण्यात आली. ती प्रणाली या रोबोटमध्ये बसविण्यात आली. या प्रणालीमुळे युनिव्हर्सिटीबद्धल माहिती घेण्याचे काम सोपे झाले आहे.

Leave a Comment