स्मायली, इमोजी, इमोटिकेन मधील फरक जाणता?


आजचा जमाना स्मार्टफोनचा आहे. स्मार्टफोनमुळे एकमेकांच्या संपर्कात सतत राहणे खूपच सोपे झाले आहे. फोनवरून नुसत्या गप्पा होतात व त्यावेळी अन्य कांही कामे करता येत नाहीत ही अडचण मेसेजिंग अॅप्सनी दूर केली आहे. मेसेजिंगमुळे दोस्त, नातेवाईक किंवा जिवलग अशा सर्वांशी एकाचवेळी तेही चोवीस तास संपर्कात राहता येते. आता तर शब्द लिहिण्याची किवा उच्चारण्याची गरजही विविध प्रकारच्या इमोजी, स्मायलींमुळे संपुष्टात आली आहे. तुमची भावना व्यक्त करण्यासाठी एखादी इमोजीही पुरेशी ठरते आहे.


युवा पिढीकडून चॅटिंग दरम्यान इमोजी, स्मायलीचा वापर सढळ हस्ताने केला जातो. मात्र अनेकांना इमोजी व स्मायली हे एकच असल्याचे वाटते. प्रत्यक्षात इमोजी, स्मायली व इमोटिकोन हे तीन वेगळे प्रकार आहेत. फिलींग व्यक्त करताना शब्द पुरत नसतील तर इमोजी स्मायलीचा वापर केला जातो. हे दोन्ही प्रकार स्मार्टफोन आल्यानंतरच खर्‍या अर्थाने अधिक रूळले असले तरी एकेकाळी टेक्स्ट मेसेज खूप पाठविले जात असत. की पॅडवर अल्फाबेट पंक्चुएशन मार्कचा वापर करून इमोटिकोन तयार केले गेले. त्यातूनही आनंद, रडणे, सरप्राईज, किस, कन्फूज्ड, राग, अपसेट, हार्ट, अँजल अशा भावना व्यक्त करता येत होत्या. आता हा प्रकार कालबाह्य झाला आहे.


पहिली स्मायली अमेरिकेतील ग्राफिक आर्टिस्ट हार्वे रोसबॉल याने तयार केल्याचे मानले जाते. पिवळ्या रंगाच्या गोलात दोन काळे ठिपके असलेले डोळे व हसणार्‍या चेहर्‍याची आठवण देणारी वक्र रेषा असे तिचे स्वरूप होते. ही स्मायली १९६२ रोजी तयार झाली होती व ती खूप पॉप्युलरही होती. स्मार्टफोन आल्यानंतर मात्र स्मायली अनेक प्रकारात आली. म्हणजे रडणे, हसणे, राग व अन्य भावना व्यक्त करणार्‍या स्मायली आल्या. इमोजीचा वापर मात्र जेव्हा खूप काही सांगायचे आहे पण शब्दात मांडणे अवघड आहे त्यावेळी केला जातो. भावनांचे पिक्टोरियल म्हणजे चित्रमयं प्रतिनिधित्व या इमोजी करतात. त्यात मानवी चेहर्यवयांप्रमाणेच प्राण्यांचे चेहरे, फळे, फुले यांचाही वापर केला जातो.

Leave a Comment