अंड्यामध्ये फ्लिपरोनिल या किटकनाशकाचे अंश सापडल्याने युरोपिय बाजारात एकच हडकंप माजला असून तातडीने कोंबड्या मारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३ लाखांहून अधिक कोंबड्या मारल्या गेल्या असून अजून कित्येक लाख कोंबड्या मारल्या जाणार आहेत असे समजते.
अंड्यांमध्ये किटकनाशकांचे अंश- युरोपिय बाजारात अंदाधुंदी
नेदरलँडमध्ये कोंबड्या मारण्याची मोहिम वेगात आहे. नेदरलॅडने किटकनाशक अंशासाठी बेल्जियमला जबाबदार धरले असून जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम,स्वीडन, स्वित्झर्लंड येथून लाखो अशी अंडी सुपरबाजारातून विकली गेली आहेत उर्वरित अंडी नष्ट केली जात आहेत. पोल्टी फार्म संघटनेने ही माहिती दिली आहे. वरील किटकनाशक माशा पळविण्यासाठी वापरले जाते मात्र जे प्राणी मानवी आहाराचा भाग आहेत त्यांच्यावर हे रसायन वापरण्यास बंदी आहे. या किटकनाशकाचा वाईट परिणाम माणसाची मूत्रपिंडे, यकृत व थाररॉईड ग्रंथींवर होतो.
बेल्जियम सरकारने या संदर्भातील अहवाल खाद्य सुरक्षा संस्थेला मंगळवारपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. या संस्थेवर असे आरोप केले जात आहेत की अंड्यात किटकनाशकांचे अंश असल्याची माहिती संस्थेला जूनमध्येच मिळाली होती तरीही अन्य देशांना २० जजुपर्यंत अंधारात ठेवले गेले.