विद्यार्थ्यांनी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी बनविली १०० फुट लांबीची राखी


मुरादाबाद – आज देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असून मुरादाबाद येथील विद्यार्थ्यांनी तब्बल १०० फुट लांबीची राखी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी बनविली आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करित सैनिक देशाची रक्षा करण्यासठी सज्ज असतात. ही राखी त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बनविली असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. विद्यार्थांनी तयार केलेल्या राखीची रचना वैविध्यपूर्ण असून या राखीवर भारतीय परंपरा, संस्कृती यांचे चित्रण करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही राखी सैनिकांना पाठविली जाणार आहे.

Leave a Comment