जाणून घ्या ‘फ्रेंडशीप डे’चा इतिहास


मुंबई : आजकालच्या तरूणाईला ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि ‘फ्रेंडशिप डे’ हे दोन दिवस फार महत्त्वाचे झाले आहेत. आज जगभरातील अनेक मंडळी ‘फ्रेंडशिप डे’ हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतील. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा करणाऱ्या पण, या दिवसाचा इतिहास माहिती नसणाऱ्या आमच्या असंख्य वाचकांसाठी थोडी माहिती..

‘फ्रेंडशिप डे’ हा दिवस तारखेनुसार नाही तर, दिवसानुसार साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जी कोणती ताऱीख असेल त्या तारखेला त्या वर्षीचा ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.

भारतात अगदी अलिकडचे ‘फ्रेंडशिप डे’चे वारे वाहत असले तरी त्याची सुरूवात फार जूनी आहे. ‘फ्रेंडशिप डे’ दक्षिण अमेरिकेतील देशात खासकरून पॅराग्वेत मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’चा प्रस्तावही १९५८ मध्ये ठेवण्यात आला होता. ज्यानंतर सुरूवातीच्या काळात भेटवस्तू आणि भेटकार्ड देऊन शुभेच्छा देण्यावर भर देण्यात आला होता.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ भारतासोबतच दक्षिण अशियातील काही देशाही साजरा करतात. काही देश मात्र ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात पण, तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी नव्हे. तर, त्यांना सोईच्या असणाऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या दिवशी. ८ एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. तर, जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.

दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या २७ एप्रिल २०११ला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ३० जुलै हा दिवस ‘ आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे’ म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता.अलिकडील काही वर्षांत भारतातही ‘फ्रेंडशिप डे’ मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. बदलत्या काळाचे त्यातही डिजिटल इंडियाचे वारे भारतात वाहू लागल्यावर समाजमध्यमांना (सोशल मीडिया) भरते आले नाही तरच नवल. तर, अशा या सोशल मीडियाद्वारे, ज्यात व्हॉट्सएप, ट्विटर, फेसबुक आदींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. ज्यावर विवीध प्रकारचे डे साजरे केले जातात.