दार्जिलिंग चहा होणार महाग ?


तुम्ही जर दार्जिलिंग चहाचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण एखाद्या सकाळी आपल्याला ही चहा मिळणे कठिण होणार आहे. चायों की शैम्पेन समजली जाणारी दार्जिलिंग चहा पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंगमध्ये पहाडी भागात असलेल्या 87 बागांमध्ये उगविली जाते. यातील काही बागा या दीडशे वर्षापेक्षा अधिक जुन्या आहेत. त्यांना स्कॅाटलॅंडच्या एका व्यक्तींने येथे लावल्या होत्या. येथील चहाची विक्री दरवर्षी सुमारे 80 मिलीयन डॅालर इतकी आहे.

दार्जिलिंगची चहा जगातील सर्वात महाग चहामधील एक आहे. जुनपासून येथील गोरखा समुदाय आपल्या वेगळ्या राज्यांची मागणी करीत आहे. त्यांच्या परिणाम या परिसरावर झाला आहे.

उत्पादनावर झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्मेच उत्पादन झाले आहे. अजून काम बंद झाले तर 40 मिलीयन डॅालरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दार्जिलिंग चाय असोसिएशनसमोर मोठे संकट आहे की ते मागणी तसा पुरवठा करण्यास असमर्थ आहेत.

Leave a Comment