“१००” डायल करणाऱ्या इमर्जन्सी कॉलर्सना “geo-locate” करणार मुंबई पोलिस


दर दिवशी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षामध्ये साधारण ५० हजार फोन मदत मागण्यासाठी किंवा गुन्ह्याची सूचना देण्यासाठी येत असतात. काही अडचणीच्या वेळी नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यास कधी तांत्रिक अडचणीमुळे तर कधी नेटवर्क व्यवास्थित नसल्यामुळे किती तरी वेळेस नागरिकांची मदतीची हाक पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नाही.पण आता मुंबई पोलिसांकडे या अडचणीतून मार्ग काढणारे नवे सॉफ्टवेअर आले आहे. इमर्जन्सी नंबर “ १०० “ डायल करणाऱ्या व्यक्तीचे “geo location” , म्हणजेच त्या व्यक्तीचा ठाव-ठिकाणा या सॉफ्टवेअरच्या मदतीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्वरित समजणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांची तुकडी घटनास्थळी आणखीनच त्वरेने पोहोचू शकणार आहे.

कित्येकदा, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना, पोलिसांना फोन केल्यानंतर आपला ठाव ठिकाणा नेमका सांगता येणे कठीण जाते. नियंत्रण कक्षामध्ये असलेल्या नवीन सॉफ्टवेअरच्या मदतीने आता या अडचणीचे निवारण होणार आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे पोलिस कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण दिले जाणार असून, पोलिस नियंत्रण कक्षांच्या संख्यामध्ये ही वाढ केली जाणार असल्याचे समजते. या सुविधेमुळे आता नागरिकांपर्यंत पोलिसांची मदत अधिक त्वरेने पोचणे शक्य होणार आहे. या सॉफ्टवेअरमार्फत केल्या गेलेल्या फोनच्या द्वारे नागरिकांची व्यक्तिगत माहिती उघड न होता केवळ फोन करणाऱ्या व्यक्तीचे location समजणार आहे.

Leave a Comment