चिनी राख्यांना नो डिमांड


रक्षाबंधनाचा सण तोंडावर आला असताना देशभरातील बाजारात राखी खरेदीची धूम माजली आहे. विशेष म्हणजे यंदा चिनी राख्यांना नो डिमांड असल्याचे अनुभव दुकानदार घेत आहेत. यंदा अनेक दुकानदारांनी चिनी राख्या मागविलेल्याच नाहीत पण ज्या दुकानांतून चिनी राख्या आहेत त्यांना ग्राहकांकडूनच प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.

भारती चीन संबंधातील तणावांमुळे चिनी मालाला सोशल मिडीयावरून जोरदार विरोध केला जात आहे व त्याचा परिणाम आता दिसू लागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी फॅशनेबल, चमकदार चिनी राख्यांना भारतीय बाजारात चांगली मागणी असते. यंदा मात्र या राख्यांना ग्राहकांकडून नकार दिला जात आहे. लहान मुलांच्या राख्यांत विशेषतः कार्टून राख्यात चिनी राख्यांचे वर्चस्व हेाते तेही यंदा कमी झाल्याचे दिसत आहे. यंदा खडे बसविलेल्या, ब्रेसलेट टाईप राख्यांना सर्वाधिक पसंती मिळाली असून त्यांच्या किमती ६० रूपयांपासून ३५० रूपयांपर्यंत आहेत. रेशमी, मोती जडविलेल्या, जरीच्या राख्या अगदी ५ रूपयांपासून ४० रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Leave a Comment