स्वातंत्र्यदिनाला कोणती साडी नेसू? अमेरिकी राजदूत संभ्रमात


भारताचा स्वातंत्र्यदिन आता तोंडावर आला असताना अमेरिकेच्या भारतातील राजदूत मेरीके कार्लसन याही भारतीय गृहिणींप्रमाणे संभ्रमात पडल्या आहेत. कोणत्याही कार्याला जाताना कोणती साडी नेसू असे प्रत्येक भारतीय महिला विचारते त्याप्रमाणे कार्लसन यांनीही स्वांतंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात कोणती साडी नेसू असा प्रश्न ट्वीटरवर टाकून नागरिकांची मते मागविली आहेत. विशेष म्हणजे कार्लसन बाईंच्या या आवाहनाला फॉलोअर्सनी त्वरीत प्रतिसाद देताना त्यांची पसंती कळविली आहे.

मेरीको कार्लसन यांनी ५ ऑगस्ट रोजी खांदी भांडारात करत असलेल्या खरेदीचे फोटो पोस्ट करून त्यावर विविध चार साड्यांमधले त्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात डुपियन सिल्क, कांजीवरम, टसर साड्यांचा समावेश आहे. त्या म्हणतात, भारतीय साडी मला अतिशय आवडते आणि भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनामिमित्त कोणती साडी नेसावी या संभ्रमात मी सापडले आहे.