भारतपाक सीमेवर स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लक्ष


पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी, हत्यारांची आवक रोखण्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून मार्च २०१८ पर्यंत भारत पाक सीमेचे संपूर्ण रक्षण या तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जाणार असल्याचे बीएसएफचे डीजी के.के. शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले हा प्रयोग इस्त्रायलमध्ये यशस्वी ठरला आहे. भारतात या प्रयोगासाठी क्रॉन सिस्टिम कंपनीचे सहकार्य घेतले जात असून टाटा व भेल यांचाही सहयोग यात आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच जागी बसून संपूर्ण सीमेवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

भारत पाक सीमा उंच पहाड, नद्या, वाळवंट अशा विविध भौगोलिक स्थितीत आहे त्यामुळे तिची सुरक्षा हा कळीचा मुद्दा बनतो. स्मार्ट उपकरणे, लेझर भिंती, नाईट व्हीजन उपकरणे, ड्रोन, हँड थर्मल इमेजर्स, बॅटल फिल्ड सर्वेलन्स साठी रडार, हाय पॉवर टेलिस्कोप अशा विविध उपकरणांचा वापर त्यासाठी केला जात आहे. भारत पाक सीमा ३३२३ किमी ची असून त्यातील २९०० किमी भाग नद्या पर्वतांनी व्यापलेला आहे. पठाणकोट तळावर झालेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता व त्यानुसार काम सुरू केले गेले होते असेही समजते.

Leave a Comment