रामदेव बाबांची जीन्स एप्रिल पासून होणार उपलब्ध


नवी दिल्ली – बाबा रामदेव यांचा पतंजली उद्योग समूह पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून बाजारात जीन्स सादर करणार आहे. बाबा रामदेव दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तू नंतर आता देशभर वस्त्रदालन उघडण्याच्या तयारीला लागले आहेत.

स्वदेशी वस्त्रांची दालने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे बाबांचे प्रवक्ते एस के तिजारावाला यांनी सांगितल्याचा एका अर्थविषयक दैनिकाने दावा केला आहे. बालकांसहीत महिला आणि पुरुषासाठींची संपूर्ण श्रृंखला या दालनांमध्ये उपलब्ध असणार आहे. कंपनीने पहिल्या वर्षात पाच हजार कोटींचे लक्ष्य निर्धारीत केला आहे. तिजारावाला यांच्या म्हणण्यानूसार पंतजली सर्वप्रथम हातशिवणीसह यंत्रनिर्मित वस्त्रप्रावरणांच्या विक्रीपासून सुरुवात करेल. यात डेनिमपासून निर्मिलेल्या वस्त्रांचा समावेश असेल.

‘परिधान’ असे या वस्त्रदालनाचे नाव असेल. पहिल्याटप्प्यात अशी २५० दालने उघडण्यात येतील. याव्यतिरीक्त पतंजली निर्मित वस्त्रांची बिग बाजारसहीत खादी भवन सारख्या देशातील अन्य किरकोळ विक्री केंद्रातून देखील विक्री करण्यात येणार आहे.

फेसबुक आणि गूगलसोबत आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपनीने करार केला आहे. यामुळे ग्राहकांना या दोन्ही संकतेस्थळावरून घरी बसून देखील मागणी नोंदवता येणार आहे. पतंजलीची सुरुवात झाली तेंव्हापासून कंपनीने टीव्ही आणि वर्तमानपत्र जाहिरांतीवर विशेष ध्यान केंद्रीत केले होते. आता आपल्या नव्या उत्पादन विभागासाठी ऑनलाईनकडेही कंपनीने मोर्चा वळवला आहे.

Leave a Comment