आता ‘एसटी’चा प्रवास देखील होणार मनोरंजक


शेगाव : प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये आणि प्रवासादरम्यान प्रवाशांचे मनोरंजन व्हावे यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये इंटरनेटची मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही सेवा राज्यभरात दिली जात आहे. यात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातील सर्व ५० गाड्यांमध्ये उपलब्ध करून दिल्या गेली आहे. वाय-फाय सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्या मोबाइल अॅपद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, लहान मुलांसाठी कार्टून, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका पाहता येणार आहेत.

प्रवाशांना यासाठी फक्त एकदाच त्यांचा मोबाईल वाय-फाय यंत्रणेला जोडावा लागणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक प्रवासात त्यांच्या मोबाइलवर ही सुविधा नियमित उपलब्ध होईल.

Leave a Comment