वाहन चालविण्याचे भन्नाट कायदे असलेले देश


जगातील प्रत्येक देशाने वाहनचालकांसाठी कांही कायदे नियम केलेले आहेत. भारतात हे कायदे त्यामानाने सुलभ व सोपे आहेत तरीही येथील नागरिक ते पाळताना दिसत नाहीत. जगात काही देशात वाहनचालकांसाठी कांही भन्नाट कायदे आहेत व ते पाळले न गेल्यास दंड अथवा शिक्षेची तरतूदही आहे.


थायलंड- पर्यटकांचा ओघ थायलंडकडे सतत सुरू असतो कारण पर्यटनासाठी हा जगात लोकप्रिय देश आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. येथे वाहनचालकांसाठी असणार्‍या कायद्यात एक कायदा असा आहे की उघड्या अंगाने तुम्ही येथे वाहन चालवू शकत नाही. म्हणजे पुरूष चालक असेल तरी त्याला विनाशर्ट वाहन चालविणे मना आहे. कितीही उकाडा असला तरी हा नियम पाळावा लागतो अन्यथा ३०० ते ४०० रूपये दंड आकारला जातो. सायप्रस या देशात वाहन चालविताना चालकाला कांही खाणेपिणे करता येत नाही. जर वाहन चालविताना तुम्ही कांही खाताना अथवा पिताना पकडले गेलात तर दंड ठोठावला जातो.


चीन- या देशांत वाहनांची संख्याही खूप आहे व हरतर्हेकची वाहने येथे सुखनैव मार्गक्रमणा करत असतात. चीनमध्ये रस्त्यातून गर्दीही खूप असते. मात्र वाहनचालकांना कोणत्याही परिस्थितीत फुटपाथवरून गाडी नेता येत नाही. त्यामुळे भारताप्रमाणे फुटपाथवरच पार्क केलेल्या गाड्या येथे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. असे आढळले तर २५० रूपये दंड भरायची तयारी ठेवावी लागते. जपानमध्ये वाहनचालकांसाठी नियम मुळातच कडक आहेत. मात्र एका नियमानुसार रस्त्यात पाणी साठले असेल व तुमच्या कारमुळे ते उडविले गेले तर ते बेकायदा मानले जाते व त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. आपल्याकडे पावसाळ्यात रस्त्यातील पाण्यातून मुद्दाम वेगाने वाहने नेऊन शेजारून जाणार्‍या नागरिकांना भिजविण्याची मजा जपानमधील वाहनचालकांना लुटता येत नाही.

राशियातील मास्को येथे तुम्ही वाहन रस्त्यावर आणता तेव्हा ते घाणेरडे असता कामा नये असा नियम आहे. तुमची कार रस्त्यावर येते तेव्हा ती स्वच्छ हवी असा नियम असून तो मोडल्यास ३४०० रूपये दंड भरावा लागतो. स्पेनमध्ये वाहनचालक वाहन चालविताना स्लीपर घालू शकत नाहीत तसेच पायात कांहीच न घालता म्हणजे अनवाणीही वाहन चालवू शकत नाहीत. हाय हिल्स घालूनही येथे वाहन चालविण्यावर बंदी आहे.


स्वीडनमध्ये तुम्ही भरदिवसा गाडी चालवित असलात तरी गाडीचे हेडलाईट सुरू ठेवणे बंधनकारक आहे. थंडीच्या दिवसांत हेडलाईट बंद करून कुणी जाताना दिसला तर त्याला जागेवर दंड ठोठावला जातो. सरकारने हा नियम अपघात होऊ नयेत यासाठी केला आहे. अमेरिकेतील डेनेव्हर येथे रविवारी काळ्या रंगाची कार अथवा वाहन रस्त्यावर आणता येत नाही. नियम मोडल्यास शिक्षा होते. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये रविवारी कार धुण्यावर बंदी आहे. असे करताना कुणी आढळले तर दंड केला जातो. फिलिपिन्समधील मनीला येथे तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटवर शेवटा आकडा १ किवा २ असेल तर त्यांना सोमवारी वाहन रस्त्यावर आणता येत नाही.

Leave a Comment