सर्वाधिक मायलेज देणा-या बाईक बजाजने लॉन्च केल्या


नवी दिल्ली – आपल्या दोन बाईक्स अपडेट करुन बजाज ऑटोने रिलॉन्च केल्या असून बजाजने प्लॅटिना ES स्पोक आणि CT 100 ES अलॉय या दोन बाईक्स पून्हा लॉन्च केल्या आहेत. आता नव्या रुपात या दोन्ही बाईक्स आल्या असून यामध्ये अनेक नवीन फीचर्सही देण्यात आले आहेत.

CT 100 ही बजाजची बजेटमधील बाईक आहे. इलेक्ट्रिक स्टार्ट आणि अलॉय व्हिक असलेल्या या बाईकची एक्स शो रूममधील किंमत ४१,९९७ रुपये आहे. या गाडीचा लूक जरी सिंपल असला तरी परफॉरमंस आणि मायलेज या गाडीची खास बाब आहे. या गाडीचा मायलेज अधिक आहे तर कमी किंमत हे या गाडीचे दोन प्लस पॉईंट आहेत. पॉवरसाठी यामध्ये १०० सीसीचे इंजिन देण्यात आले असून जे ८.२ पीएसची पॉवर आणि ८.०५एनएमचे टार्क देते.

बजाज प्लॅटीना ES अलॉय व्हीक या गाडीची दिल्लीतील एक्स शो रूममधील किंमत ४२,६५० रुपये ऐवढी असून वेळोवेळी नवनवे बदल या गाडीत पहायला मिळत आहेत. या गाडीच्या सीटला स्प्रिंग टाइपमध्ये बनविण्यात आले असून तसेच फ्रंट सस्पेंशन २८% लांब केले आहे तर रिअर स्प्रिंग सस्पेंशन आता २२% एक्स्ट्रा असल्यामुळे ही बाईक खराब रस्त्यावरही स्मुथ चालते आणि राइडची मजा बाईक रायडरला घेता येते. या बाईकमध्ये १०२सीसीचे इंजिन, ८.२ पीएम्स पॉवर, ८.६ एनएम टार्क आणि ४ स्पीड गिअरच्या मदतीने बाईक चांगला परफॉरमन्स देते.

Leave a Comment