नवी दिल्ली : तीन नवीन प्लान सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने लॉन्च केले असून हे प्लान काही ठराविक सर्कलसाठी देण्यात आले आहेत. २५८ रुपये, ३७८ रुपये आणि ५४८ रुपये असे तीन प्लान कंपनीने जारी केले आहेत. यातील दोन प्लान पंजाब आणि गुजरात सर्कलसाठी आहेत. सर्कलनुसार प्लानची किंमत वेगवेगळी असण्याची शक्यता आहे. नव्या प्लान नुसार ९० दिवसांत दररोज ५ जीबी डाटा मिळणार आहे.
बीएसएनएल देणार दररोज ५ जीबी डाटा!
२५८ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला २२० रुपयांचा टॉकटाइम, ११० प्री ऑन-नेट वॉईस कॉलिंग ( बीएसएनएल ते बीएसएनएल). याची ३० दिवस वैधता देण्यात येईल
३७८ रुपयांच्या प्लानमध्ये ४ जीबी प्रतिदिन डेटा, एक दिवसात ४ जीबी टेडा संपला की ८० केबीपीएस स्पीड मिळेल. अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आणि ऑफ नेटसाठी ३० मिनिटे प्रतिदिन मिळणार, ३० दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
५४८ रुपयांच्या प्लानमध्ये ३ महिन्यांसाठी ५ जीबी डेटा प्रतिदिन मिळेल. डेटा लिमिट संपल्यानंतर ८० केबीपीएस स्पीड मिळेल. यात व्हाईस कॉलिंग सुविधा मिळणार नाही.