या पाच देशांत आहेत विचित्र कायदे


जगातील प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदेकानून असतात. नागरिकांनी हे कायदे पाळणे हे त्यांचे कर्तव्य समजले जाते. कायदा मोडला तर शिक्षेची, दंडाची तरतूदही केली गेलेली असते. सर्वसाधारण पणे बहुतेक देशात हिंसा,चोरीमारी, फसवणूक, भ्रष्टाचार, अशा प्रकारांसाठी कायद्यानुरूप शिक्षा सुनावल्या जातात. नियम तोडला, गुन्हा केला की शिक्षा होणारच याची आपल्यालाही कल्पना असते. मात्र जगातील नावाजलेल्या काही देशात अगदी विचित्र कायदेही आहेत व ते मोडणार्‍यांना दंड व शिक्षा यांची तरतूदही केली गेली आहे.

इटली- इटलीच्या मिलान मध्ये तुम्ही हसताना दिसले पाहिजे असा कायदा आहे. तुम्ही हसताना दिसला नाहीत तर दंड म्हणून मोठी रक्कम तुमच्याकडून वसूल केली जाते. अर्थात नियमाला अपवाद येथेही आहे. ते म्हणजे, स्मशान अथवा हॉस्पिटल परिसरात तुम्ही हसताना दिसला नाहीत तरी तो गुन्हा मानला जात नाही.


स्वित्झर्लंडमध्ये रात्री दहा नंतर टॉयलेटचा फ्लश वापरण्यावर बंदी आहे. रात्री दहा नंतर फ्लशचा वापर केला तर तो गुन्हा मानला जातो. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी हा नियम केला गेला आहे असे सांगतात.

अमेरिकेतील ओक्लोहामा प्रांतात कुत्र्याला चिडविणे, त्रास देणे हा गुन्हा मानला जातो. कुत्र्यासमोर तोंडे वेडीवाकडी करणे असले प्रकार करून तुम्ही कुत्र्याला चिडवत असताना पकडले गेलात तर थेट अटक केली जाते. तसेच डेन्मार्कमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाऊन तेथील खाद्यपदार्थांबाबत आपण समाधानी नसलो तर पैसे द्यावे लागत नाहीत. खाद्यपदार्थांनी पोट भरले नसेल तर रेस्टॉरंट मालक तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही असा तेथे नियम आहे.


फिलिपिन्समध्ये कुणालाही त्रास देणे हा गुन्हा आहे. तुम्ही कुणाला त्रास देत असताना दिसलात अथवा तुम्ही त्रास देत असल्याची तक्रार कुणी केली तर आर्टिकल २८७ खाली गुन्हा दाखल करून त्यासाठीची शिक्षा सुनावली जाते.तेव्हा कधीमधी या देशांत जायची पाळी आली तर वरील नियम नक्की लक्षात ठेवा.

Leave a Comment