मृत ज्वालामुखीच्या अंगावर वसलेली असूकुजु रिझॉर्टस


जपान हा जगाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी धक्के देऊन चकीत करणारा देश मानला जातो. २०११ च्या प्रलयंकारी त्सुनामीत जपानच्या ज्या भागात प्रचंड नुकसान होऊन तो भाग उध्वस्त झाला होता तेथे आज आपण भेट दिली तर कुठल्या वेगळ्याच सुंदर दुनियेत आपण पोहोचलो असा भास होतो. वरून पाहिले तर गोलगोल, रंगीबेरंगी सुंदर घरे व चोहोबाजूला पसरलेली हिरवळ दिसली की येथेच कायमचे रहावे अशी इच्छा कोणालाही होईल.


जपानच्या क्यूश्यू प्रीफेक्चर मधल्या अुसूकुजू नॅशनल पार्क मधली हॉटेल्स व रिझॉर्ट तमाम पर्यटकांना त्यांच्याकडे आकर्षून घेत आहेत. हा भाग मृत ज्यालामुखीच्या तोंडावर वसलेला आहे. अणि विशेष म्हणजे या इमारती अशा पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत की या भागात ५०० भूकंप झाले तरी त्यांना कोणतीही हानी पोहोचणार नाही. जमिनीपासून १८०० फूट उंचीवर ही पॉलीस्ट्रीन घरे उभारली गेली आहेत.

येथील रिसॉर्ट अथवा हाॅटेलमध्ये खोली बुक केली तर एका रात्रीसाठी साधारण १२ हजार रूपये भाडे भरावे लागते. येथे स्विमिंग पूल, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंटस, जिम अशा सर्व सुविधाही दिल्या जातात. एखादी सुंदर ठिपक्यांची रांगोळी काढून ती विविध रंगांनी सजवावी तशी ही घरे दिसतात. जपानला राखेतून उठणार्‍या फिनिक्स पक्ष्याची उपमा दिली जाते ती किती सार्थ आहे हे या भागाला भेट दिल्यानंतर कळते.

Leave a Comment