चिनी स्मार्टफोन्सनी व्यापला जागतिक बाजाराचा निम्मा हिस्सा


मार्केट रिसर्च कंपनी काऊंट पॉईंटने नुकत्याच जाहीर केलेल्या संशोधन अहवालानुसार चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी जागतिक स्मार्टफोन बाजारावर ४८ टक्के कब्जा केला आहे. २०१७ च्या दुसर्‍या तिमाहीत स्मार्टफोन्सच्या जागतिक विक्रीत ३ टक्के वाढ नोंदविली गेली असून चिनी कंपन्यांनी अॅपलला मागे टाकत मार्केटमधील ४८ टक्के हिस्सा मिळविला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या या अहवालानुसार भारत, द.आशिया व अफ्रिकेसह जगातील जवळजवळ अर्धे मार्केट चिनी कंपन्यांच्या ताब्यात गेले आहे.

बाजारात चांगला हिस्सा मिळविणार्‍या चिनी कंपन्यात शाओमीच्या विक्रीत ६० टक्के, बिवोच्या ४५, ओप्पो ३३ तर वावे २० टक्के वाढ नोंदविली गेली आहे. २०१७ च्या पहिल्या सहा महिन्यात चिनी कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायाचा जगभर विस्तार केला असून सॅमसंगच्या विक्रीत या काळात ४ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

Leave a Comment