आता ‘पेटीएम’ अॅपवरुनही पाठवता येणार मेसेज


नवी दिल्ली – ग्राहकांना नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांसाठी आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरलेल्या ‘पेटीएम’च्या अॅपवर आता मेसेजही पाठवता येणार असून पेटीएमचा याद्वारे व्हॉट्स अॅपला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे.

काही दिवसांपूर्वी भारतात ‘डिजिटल पेमेंट सर्व्हिस’ क्षेत्रात उतरण्याचा मानस फेसबुकची मालकी असलेल्या ‘व्हॉट्स अॅप’ने व्यक्त केला होता. पेटीएमने आता ‘व्हॉट्स अॅप’वर पलटवार करण्यासाठी त्यांच्या अॅपवर ‘मेसेजिंग सर्व्हिस’ देण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएम युजर्सना अॅपवरुन मेसेजसोबतच व्हिडिओ, ऑडिओ आणि फोटो पाठवता येतील. ही सुविधा येत्या महिना अखेरपर्यंत उपलब्ध असेल असे समजते.

काही दिवसांपापूर्वी भारतात डिजिटल पेमेंट क्षेत्रात उतरण्याचा मानस ‘व्हॉट्स अॅप’ने व्यक्त केला होता. यासाठी यूपीआयसोबत ‘व्हॉट्स अॅप’ चर्चाही करत असल्याचे वृत्त आहे. यापार्श्वभूमीवर ‘पेटीएम’चा निर्णय महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.