अबब... निता अंबानींच्या मोबाईलची किंमत ३१५ कोटी? - Majha Paper

अबब… निता अंबानींच्या मोबाईलची किंमत ३१५ कोटी?


उद्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी निता अंबानी या नेहमीच त्यांच्या राहणीमान, कपडे, आलिशान घड्याळे, ब्रँडेड सँडल, महागडे परफ्युमसाठी चर्चेत असतात. पण आता एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात महागडा असा मोबाईल फोन नीता अंबानी या वापरतात. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या फोनची किंमत ऐकली तर चक्कर येऊ शकेल. जो फोन त्या वापरतात त्याची किंमत ३१५ कोटी असल्याची चर्चा आहे.

‘फाल्कन सुपरनोव्हा आयफोन ६ पिंक डायमंड’ हा फोन निता अंबानी या वापरतात. हा हँडसेट २०१४ मध्ये लाँच करण्यात आला होता. याबाबतचे वृत्त ‘एशिया न्यूजनेट’ने दिले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खास सेलिब्रिटींसाठी हा फोन बनवला जातो. पूर्णपणे २४ कॅरेट सोन्यापासून हा फोन बनवला आहे. यावर प्लॅटिनमची कोटींग देखील आहे. त्यामुळे हा फोन पडला तरी तुटणार नाही. या फोनच्या मागे महागडा असा गुलाबी रंगाचा हिरा देखील आहे. हा फोन कोणाही हँक करू शकत नाही आणि जर हॅक करण्याचा प्रयत्न केलाच तर लगेचच त्याचा अलर्ट युजर्सला जातो. म्हणूनच या फोनची किंमत ३११ कोटी असल्याचे समजते.

Leave a Comment