मुंबई : इंटरनेट जायंट सर्च इंजिन म्हणून ओळख असणा-या गूगलच्या ‘गुगल प्ले अॅप’ने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. गूगल प्ले सर्व्हिस अॅपने पाच अब्ज डाऊनलोडस्चा टप्पा पार केला आहे. ‘अँड्रॉईड पोलिस’च्या रिपोर्टनुसार, सर्वच अॅप मॅन्युअली डाऊनलोड केलेले नाहीत, तर अनेक स्मार्टफोनमध्ये बाय डिफॉलट गूगल प्ले सर्व्हिस अॅप दिले जाते. त्यामुळे पहिल्यापासूनच इन्स्टॉल असलेल्या अॅपचीही डाऊनलोड्समध्ये नोंद होते.
गुगल ‘या’ अॅपने रचला विश्वविक्रम
गूगल प्ले सर्व्हिससेबत यू टय़ूब, क्रोम, गूगल मॅप्स, जीमेल, सर्च हे अॅपही अनेक स्मार्टफोनमध्ये मोफत इन्स्टॉल करून दिले जातात. त्यामुळे बहुतांश स्मार्टफोनवर गूगलचे हे सातही अॅप असतात. मात्र, या सातमधील एवादे अॅप नसले, तरी प्ले सर्व्हिस सर्वच स्मार्टफोनमध्ये असतेच.दरम्यान, गूगलवर ‘लिप्पझन’नावाचे स्पायवेअर आले असून, यूजर्सचे टेकस्ट, मेसेजेस, व्हॅईट कॉल्स, लोकेशन डेटा आणि फोटो जप्त करते.