मोठी सुटी घेतल्याने वाढते कार्यक्षमता


वर्षातून किमान दोन वेळा जे लोक दीर्घ सुटी घेतात त्यांची कार्यक्षमता सुटी न घेण्यार्‍यांच्या तुलनेत अधिक असते असे अमेरिकेतील विन्स्कोन्सिन विद्यापीठातील संशोधकांनी केलेले संशोधनात आढळून आले आहे. सुटीमुळे कामाचा ताण ओसरतो, लोक अधिक आनंदी राहतात व सुटी संपताच जोमाने कामाला सुरवात करतात व चांगल्या प्रतीचे काम करतात असे यात आढळून आले आहे.

सुटीच्या काळात स्वप्ने रंगविणे, प्लॅनिंग करणे या गोष्टीही मूड बूस्टर म्हणून काम करतात मात्र या काळात गॅजेटपासून दूर राहणे आवश्यक आहे असे हे संशोधन सांगते. मौज मस्ती, आराम, कोणताही ताण नसलेला काळ यामुळे आनंद मिळतोच पण त्याचबरोबर शरीरातील स्ट्रेस वाढविणारे कोर्टिसोल हार्मोन कमी होते. सततच्या व्यस्त दिनचर्येत छोटासा ब्रेकही मनाला ताजगी देतो असेही हे संशोधन सांगते.


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मधील संशोधनात असे दिसले की कामाच्या प्रचंड प्रेशरनंतर ब्रेक घेणार्‍यांची निर्णय क्षमता अधिक दृढ होते, त्यांची कार्यक्षमता वाढते. अर्थात उन्हाळ्याच्या दिवसात सुटी घेत असाल तर जादा कडक उन्हात न फिरणे पाळायला हवे. हलके अन्न सेवन, गारव्यातील आराम व आवडीचे वाचन मनाला उत्साहित बनविते. हसणे हा ही स्ट्रेस कमी करण्याचा एक चांगला व फुकटातला मार्ग आहे. मनापासून खळखळून हसण्याने मेंदूतील इंडोर्फिन हार्मोन अधिक स्त्रवते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वर्षातून दोन मोठ्या सुट्या घेतल्या तर हृदयरोगाचा धोका सुटी न घेण्यार्‍यांपैक्षा आठपटीने कमी होतो. अर्थात सुटी एन्जॉय करण्यासाठी भरमसाठ खर्चाची आवश्यकता नाही. त्या ऐवजी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळविता येतो.

निसर्गाशी संवाद, निसर्गातली भटकंती, नवीन स्वाद चाखणे, हलकेफुलके आरामदायी कपड्यांचा वापर करण्यातूनही नवी उर्जा मिळविता येते. यामुळेच जेव्हा निराश वाटते किंवा उदासी येते तेव्हा बाहेर फिरायला जाण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो.

Leave a Comment