बजाजची क्यूट कार लवकरच भारतात


बहुगुणी, बहुदुधी ठरणारी बजाजची छोटी क्यूट इंडोनेशियात लाँच केली गेली असून या वर्षअखेर ही कार भारतात दाखल होईल असे समजते.गुजराथच्या शोरूममध्ये या कारची झलक दिसली आहे. क्यूट क्वाड्रीसायकल नावाच्या या कारला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारतातही छोट्या, स्वस्त कार्सना चांगली मागणी आहे. बजाजची क्यूट ग्राहकांच्या या अपेक्षा पुर्‍या करेलच शिवाय ही कार सहज परवडणारीही ठरणार आहे. कारण कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार लिटरला ३२ किमीचे मायलेज देते आहे.

या कारसाठी २१६.६ सीसीचे सिंगल सिलींडर फ्यूल इंजेक्टेड वॉटरकूल्ड डिजिटल ट्रायस्पार्क इंग्निशन फोर व्हॉल्व्ह पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. पाच स्पीड सिक्वेन्शल गिअरबॉक्स असून ही कार फोर सीटर आहे. यात कोणतीही अत्याधुनिक फिचर्स नाहीत. सहा कलरमध्ये ती उपलब्ध केली जाणार आहे. या कारची किंमत एक्स शो रूम १लाख २० हजार रूपये ठेवली गेली आहे.

Leave a Comment