एअरटेल पेमेंट बँक एचपी पंपांवर देणार बँक सेवा


एअरटेल पेमेंटस बँक व हिदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन यांच्यात नुकत्याच झालेल्या सहकार्य करारानुसर एअरटेल पेमेंट बँक देशभरातील एचपीच्या १४००० पंपांवर त्यांच्या बँकेची सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे. या शाखा पॉईंट रूपात काम करणार असून तेथे ग्राहकांना नवीन खाते उघडणे, पैसे काढणे, भरणे व ट्रान्स्फर करणे अशा सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

बँकेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार यामागे ग्राहकांची सोय व्हावी याचबरोबर देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे असे दोन हेतू आहेत. तसेच बँकेचे रिटेल नेटवर्क वाढविण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. सध्या देशात ३ लाख एअरटेल रिटेल आउटलेट बँकींग पॉईंटस कार्यरत आहेत. पेट्रोलपंपांवरून आऊटलेट पॉईंटमधून इंधन खरेदी करताना मोबाईल फोनच्या सहाय्याने सुरक्षित व सोईचे पेमेंट करणे ग्राहकांना शक्य होणार आहे.

Leave a Comment