यंदा सप्टेंबरमध्येच फ्लिपकार्ट, अॅमेझॉन चे धमाल सेल


ई कॉमर्स कंपन्या सर्वसाधारणपणे आक्टोबर मध्ये त्यांचे फेस्टीव्ह सीझन सेल सुरू करतात. यंदा गणेशोत्सव ऑगस्ट अखेरीस येत असल्याने फ्लिपकार्ट व अॅमेझॉन या बड्या ऑनलाईन रिटेलर कंपन्यांनी त्यांचे धमाल सेल लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांचे पहिले छोटे सेल ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान होत आहेत तर फेस्टीव्ह बिग बिलीयन सेल व ग्रेट इंडियन सेल सप्टेंबरमध्येच सुरू होणार आहेत. यंदा हे सेल तीन ऐवजी पाच दिवसांचे असतील.

गतवर्षी नोटबंदी व त्यानंतर आलेल्या जीएसटीमुळे ऑनलाईन बाजारात मंदी होती. यंदा मात्र हा बाजार चांगलाच तेजीत असेल असे अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. या सेलमधून यंदा उच्चांकी विक्री होईल असा विश्वास ऑनलाईन रिटेलर कंपन्या व्यक्त करत आहेत. यंदाची उलाढाल १.२ अब्ज ते १.५ अब्जांच्या दरम्यान होईल असे संकेत मिळत आहेत. फ्लिपकार्ट व अॅमेझॉन या दोन्ही कंपन्यांनी स्मार्टफोन विक्रीवर अधिक लक्ष केंद्रीत केले असून त्यापाठोपाठ फॅशन, होम अप्लायन्सेस यांचा नंबर आहे. या वार्षिक सेलमधून चांगल्या ऑफर ग्राहकांना दिल्या जाणार आहेत.