ब्लॅकबेरीचा शेवटचा की वन स्मार्टफोन भारतात लॉन्च


नवी दिल्ली – जागतिक मोबाईल बाजारपेठेमध्ये बहुचर्चित असलेल्या ब्लॅकबेरीने स्वत: डिझाईन केलेला की वन शेवटचा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. QWERTY कीबोर्ड यामध्ये देण्यात आला असून या स्मार्टफोनची QWERTY कीबोर्ड हीच खासियत आहे.

भारतात ब्लॅकबेरीने की वन स्मार्टफोन लॉन्च करण्याआधी यामध्ये काही बदल केले आहे आहेत. ज्यावेळी जागतिक मोबाईल मार्केटमध्ये की वन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. त्यावेळी या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली होती. पण भारतामध्ये लॉन्च करण्यात आला, त्यावेळी यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डबल सिम कार्ड वापरण्याचा ऑप्शन की वन स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. याआधी जेवढे मोबाईल मार्केटमध्ये ब्लॅकबेरीने स्मार्टफोन आणले त्यापैकी की वन स्मार्टफोन हा पहिला डबल सिम असलेला स्मार्टफोन आहे. पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर की वन स्मार्टफोनची विक्री सुरु होणार असून याची किंमत ३९,९९० रुपये ऐवढी आहे. याचबरोबर लॉन्चिंग ऑफर म्हणून या स्मार्टफोनसोबत वोडाफोनच्यावतीने ७५ जीबी डाटा देण्यात येणार आहे. हा वोडाफोन डाटा प्रिपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे.

Leave a Comment