८० टक्के कर्मचा-यांची स्नॅपडीलने केली हकालपट्टी


बेंगळूर – कर्मचा-यांच्या संख्येत मोठी कपात करण्याचा निर्णय स्नॅपडीलने घेतला असून कंपनीच्या ८० टक्के कर्मचा-यांना या निर्णयानुसार घरी पाठविण्यात येईल. आपल्या विभाग प्रमुखांना कंपनीच्या व्यवस्थापनाने ही यादी तयार करण्याचे तोंडी आदेश दिल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

कंपनीमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात ९ हजारपेक्षा जास्त कर्मचारी होते. आता ही संख्या १२०० आहे. कंपनीकडून कोणतीही नोटीस न देता ही कर्मचारी कपात करण्यात आली. नवीन निर्णयानुसार ही संख्या कमी करत गुणवत्ता असणा-या केवळ २०० कर्मचा-यांना कामावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित कर्मचा-यांनी फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलच्या विलीनीकरणासाठी समर्थन करत असल्यामुळे रोजगार वाचेल असा त्यांचा विचार होता.

Leave a Comment