स्नॅपडील फ्लिपकार्टचा विवाहाअगोदरच काडीमोड


गेले सहा महिने होणार, होणार अशी चर्चा असलेल्या फ्लिपकार्टच्या स्नॅपडील खरेदीचा व्यवहार अखेर तुटला आहे. फ्लिपकार्टने स्नॅपडीलला या सौद्यासाठी ६०८० कोटी रूपयांची ऑफर दिली होती मात्र स्नॅपडीलने ती नाकारून एकला चलो रे चा निर्णय घेतल्याचे जाहीर केले गेले आहे. या सौद्यासाठी स्नॅपडीलमध्ये मोठी गुंतवणूक असलेली सॉफ्टबँक ही कंपनी जास्त उत्सुक होती मात्र स्नॅपडीलच्या अन्य गुंतवणूकदारांनी तसेच सहसंस्थापक कुणाल बहल व रोहित बंसल यांनी या सौद्याला नकार दिला आहे.

बंसल, बहल व कंपनीच्या अन्य गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार स्नॅपडीलचे मूल्यांकन कमी केले गेले आहे. त्यामुळे शेअर होल्डरकडूनही या डीलबाबत एकमत होऊ शकले नाही. यात प्रेमजी यांचाही समावेश आहे. त्यांच्याही या डीलला होकार नव्हता. स्नॅपडीलने त्यांचे मोबाईल वॉलेट फ्री चार्ज अॅक्सिस बँकेला ६ कोटी डॉलर्स म्हणजे ३८५ कोटींना विकले असून यातून मिळालेल्या पैशातून स्नॅपडीलच्या ई कॉमर्स व्यवसायाला बूस्ट मिळविला जाईल असे कुणाल बहल यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment