दिल्ली पोलिसांनी पोस्टरसाठी निवडला लेडी कमांडोचा चेहरा


दिल्ली पोलिसांनी त्यांच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच लेडी कमांडोचा चेहरा त्यांच्या पोस्टरसाठी निवडला आहे. विशेष म्हणजे या लेडी कमांडोला मात्र पोस्टर रिलीज होईपर्यंत याची कल्पना नव्हती. तिला पोस्टर रिलीज झाल्यानंतर तिच्या सहकार्‍यांकडून आपण पोस्टरवर झळकलो याची माहिती मिळाली.

चिवेल थेले असे या लेडी कमांडोचे नांव आहे. आजपर्यंत दिल्ली पोलिस त्यांच्या पोस्टरसाठी जुनेच फोटो वापरत असे. प्रथमच लेडी कमांडोचा फोटो त्यांनी निवडला आहे. या पोस्टरमध्ये थेले एके ४७ रायफल सह दिसते आहे. अर्थात चिवेल थेले नॅशनल लेव्हलची तीरंदाज आहे. तसेच तिच्या बॅचमधली बेस्ट रायफल शूटरही आहे. प्रशिक्षणादरम्यान घेतल्या जात असलेल्या प्रत्येक अॅक्टीव्हीटीमध्येही ती बेस्ट ठरली होती. चिवेल सांगते एक दिवस कांहीही कल्पना न देता तिचे फोटोशूट केले गेले मात्र हे फोटोशूट पोस्टरसाठी होते हे तिला पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतरच कळाले.