टक्कल पडत असतानाही स्मार्ट दिसण्याच्या कांही टिप्स


पूर्वी साधारण माणूस निवृत्तीला आला की त्याला टक्कल पडू लागायचे. आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात अनेकांना तरूण वयातच केस कमी होण्याचा त्रास होतो आहे. तरूण वयात टक्कल पडू लागणे हे नाही म्हटले तरी निराशा निर्माण करते. केस कमी होत चालल्याने आपण कमी स्मार्ट किंवा वयस्कर किंवा बावळट वाटणार अशी भीती वाटणे साहजिकच आहे. मात्र टक्कल पडणे हेही मनात आणले तर ग्रेसफुली घेता येते व आपला आत्मविश्वास जराही ढळू न देता आपली स्मार्ट प्रतिमा कायम राखता येते. त्यासाठी या छोट्या टिप्स नक्कीच अजमावू शकता.

केस कमी होत असतील व टक्कल पडू लागले असेल तर कांही जण मुद्दामच केस पूर्ण काढून टाकतात. त्यानंतर जे छोटे छोटे केस उगवतात ते सतत ट्रीमिंग करत राहायचे. डोक्याची त्वचा कोरडी पडत असेल तर मॉइश्चरायझर लावून त्वचा तुकतुकीत ठेवली की आपला स्मार्टनेस राखता येतो. अशा वेळी पूर्ण टक्कल केले असेल तर उन्हात जाताना सनस्क्रीनचा वापर जरूर करावा.


दाढी- डोक्याचे केस कमी होत असतील तरी आपला स्मार्टनेस वाढविण्यासाठी दाढी उपयोगी पडते. अशा लोकांनी दाढीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. या लोकांनी कधीही क्लिन शेव्ह करू नये. हनुवटीवर छोटीशी दाढी किंवा फ्रेंच बिअ्रर्ड आपले व्यक्तीमत्त्व आकर्षक बनवू शकते व आपल्याला स्टायलीश लूकही देऊ शकते.

टॅट्यू- डोक्यावरचे केस कमी होत असतील तर त्याकडे जाणारे लक्ष आपण टॅटूंकडे वळवू शकतो. टॅटू डॅशिंग लूक देतात त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. या लोकांनी छाती, गळ्यावर टॅटू काढाले तर ते स्मार्ट दिसणारच. खांदे, हातावर कलरफुल टॅटू वेगळा लूक देतात.

बॉडी- केस कमी होत चाललेल्या तरूणांनी आपल्या बॉडीवर लक्ष दिले पाहिजे. आपली पर्सनॅलिटी डॅशिंग असेल तर लोक आपल्याकडे वळून पाहणारच. स्टायलीश, स्मार्ट कपड्यांच्या वापरातून अशी पर्सनॅलिटी मिळवता येते. या लोकांनी कपडे वापरताना ते फिटींगचे वापरावेत. ते अधिक सैल नकोत तसेच अगदी घट्ट ही नसावेत. कपड्यांमध्ये शरीराचा बांधेसूदपणा अधोरेखित होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.

Leave a Comment