काही लोक जीएसटीला विरोध कर चुकवण्यासाठी करत आहेत – अरुण जेटली


चेन्नई – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी काही सोपा सुधार नव्हता. ज्याला लागू केले जाऊ शकते, असे म्हटले. पण लोकांचा याला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद आणि नव्या टॅक्ससाठी विरोधकांपुढे न झुकण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अरुण जेटली सीआयआय आणि फिक्की यांसारख्या अनेक औद्योगिक संस्थांनी आयोजित केलेल्या जीएसटी कॉन्क्लेवमध्ये बोलत होते. ते म्हणाले, जर राष्ट्रहिताची एखाद्या गोष्ट असेल. तर, विरोधकांपुढे सरकार कधीच झुकणार नाही. आपला देश जीएसटीमुळे आणखी सुदृढ होईल. सरकार, केंद्र आणि सर्व राज्य या सुधारमुळे एकत्र आली आहेत. टॅक्स चुकवण्यासाठी काही जण जीएसटीला विरोध करत आहेत, असेही जेटली यांनी म्हटले आहे. आपण आज इतिहासाच्या अशा टप्प्यात पोहोचला आहोत, जेथे फार मोठ्या प्रमाणात लोकांचे या टॅक्स सुधार व्यवस्थेला समर्थन आहे. कारण, लोक अस्वस्थ झाले होते. भारत आपल्या क्षमतेपर्यंत पोहचू शकत नाही, या स्थितीत लोकांची इच्छा पूर्ण होणार नाही.

आर्थिक एकीकरणाची जीएसटी ही ताकद असल्यामुळेच जम्मू आणि काश्मीरलादेखील जीएसटीचा स्वीकार करावा लागला. राज्यात जीएसटी लागू न झाल्यास इनपुट क्रेडिट मिळणार नाही, असे जम्मू आणि काश्मीरच्या व्यापाऱ्यांनी आपल्या सरकारला सांगितल्यामुळे राज्यातील जनता शेजारील पंजाब राज्यातून सामान खरेदी करेल. कारण, तिथे सामान स्वस्त असेल.

जेटली म्हणाले, जीएसटी परिषदेत तर समन्वयाचे वातावरण आहे. पण, बाहेर लोक कर सुधारचा विरोध करत आहेत. परंतु, लोकांकडून जीएसटीला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. इनपुट क्रेडिट मिळणाऱ्या सहजतेवर जेटली म्हणाले की, जे ईमानदारीने जीएसटी रिटर्न दाखल करतील. त्यांना स्वयंचलित पद्धतीने इनपुट क्रेडिट मिळेल आणि त्यासाठी कोणत्याही कर अधिकाऱ्याशी संपर्क करण्याची गरज नाही. महागाईच्या दबावाला कमी करण्यासाठी करांचे विविध दर ठेवण्यात आले आहे. आम्ही खाद्य पदार्थांवर कर लावलेले नाही. किंवा खूप कमी कर लावलेले आहेत, असे जेटली म्हणाले.

Leave a Comment