मुंबई : जात-धर्म या पलिकडे देशाचा नागरिक म्हणून सैन्यात भरती झालेला प्रत्येक जवान आपले कर्तव्य बजावत असतो. पण सध्या व्हायरल सोशल मीडियात मुस्लिम धर्मीय जवान नमाज अदा करताना सीआरपीएफचा हिंदू धर्मीय ऑफिसर त्याच्या शेजारी सशस्त्र उभा राहिल्याचा फोटो झाला आहे.
सलाम सीआरपीएफच्या जवानाला
सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर अकाऊण्टवर ‘शांतीसाठी सशस्त्र बंधूत्व’ (Brothers-in-arms for peace) अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ऑन ड्युटी असताना नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या रक्षणार्थ दुसरा अधिकारी उभा आहे. धार्मिकतेच्या नावाखाली सतत काश्मिरचे खोरे धगधगत राहिले आहे. त्यातच सीआरपीएफच्या जवानांचा हा अनोखा बंधुत्ववाद सोशल मीडियावर अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे.
"Brothers-in-arms for peace" – CRPF Srinagar pic.twitter.com/QfsOIKbHoa
— Srinagar Sector CRPF (@crpf_srinagar) July 29, 2017