मेड इन इंडिया एसयूव्ही जीप कंपास लॉन्च


मुंबई : भारतात आपली एसयूव्ही जीप कंपास अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जीपने लॉन्च केली असून जीप कंपास खरतर तर अधिकृतरित्या या आधीच लॉन्च केली होती, पण आज तिच्या किंमतीची घोषणा झाली आहे. १४.९५ लाख रुपये ऐवढी या कारची सुरुवातीची किंमत आहे, तर टॉप मॉडेलची किंमत २०.६५ लाख रुपये आहे.

ही एसयूव्ही पूर्णतः मेड इन इंडिया आहे. पाच रंगांमध्ये जीप कंपास उपलब्ध असून यामध्ये मिनिमल ग्रे, एग्झॉटिक रेड, व्होकल व्हाईट, हायड्रो ब्लू आणि ब्रिलियंट ब्लॅकचा समावेश आहे. जीप कंपास मल्टीएअर पेट्रोलच्या तीन व्हेरियंट आणि ७ मल्टीएअर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये स्पोर्ट, लॉन्गिट्यूड, लॉन्गिट्यूड ऑप्शन, लिमिटेड, लिमिटेड ऑप्शन, लिमिटेड ४X४ आणि लिमिटेड ऑप्शन ४X४ ऑप्शनचा समावेश आहे.

जीप कंपासच्या एक व्हेरियंटमध्ये १.४ लीटर पेट्रोलचे ४ इंजिन देण्यात आले आहे. जे १६० हॉर्स पॉवर देते. दुसरे इंजिन २.० लीटर डीझेलचे आहे, जे १७३ हॉर्स पॉवर देतो. यात ६ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आहे. पेट्रोल व्हेरियंटसाठी ७ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शनही आहे. ही एसयूव्ही बाजारात आल्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या दुसऱ्या एसयूव्हीला कडवी टक्कर मिळू शकते.

Leave a Comment