शांतीदेवी, देशातील एकमेव महिला ट्रक मेकॅनिक


प्रवासात वाहनांची टायर पंक्चर होणे याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने घेतलेला असतो. रस्त्यात अशी वेळ ओढवली तर जवळचा मेकॅनिक शोधणे, टायर बदलणे व पंक्चर काढणे अशी कामे करून घ्यावी लागतात. आजकाल पुरूष व महिला यांची कार्यक्षेत्रे वेगळे राहिैलेली नाहीत. म्हणजे पुरूष जी कामे करू शकतात ती महिलाही करू शकतात असे अनेक क्षेत्रात दिसते. मात्र ट्रकसारख्या अवजड वाहनाचे टायर बदलणे व पंक्चर काढणे या क्षेत्रातही कुणी महिला असेल अशी कल्पना आपण करू शकणार नाही. दिल्लीच्या शांतीदेवी या ५५ वर्षीय महिलेने हे शिवधनुष्य सहजी पेलले असून महिलांसमोर आदर्श मिर्माण केला आहे.

शांतीदेवीं या क्षेत्रातल्या देशातल्या एकमेव महिला असून त्यानी त्यांचा रस्ता स्वतःच तयार केला आहे. गेली २० वर्षे त्या नॅशनल हायवे चार वरील संजय गांधी ट्रान्स्पोर्ट डेपोत पंक्चर काढण्याचे काम करत आहेत. छोट्या कार्सची बातच सोडा, शांतीदेवी मोठमोठ्या अवजड ट्रकचे अवजड टायर डोळ्याचे पात लवायच्या आत मोकळे करतात व पंक्चरही काढतात. ५०किलो वजनाची टायर त्या सहजी उचलतात. दिवसातून १२ तास त्या हे काम करतात व रोज किमान १० ते १५ पंक्चर्स काढतात.

Leave a Comment