जगातील सर्वाधिक लांबीचा सस्पेन्शन ब्रिज स्वित्झर्लंडमध्ये खुला


शनिवारी जगातील सर्वाधिक लांबीच्या पादचारी पुलाचे उद्धाटन स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले.युरोपा ब्रयुक असे या पुलाचे नामकरण करण्यात आले असून त्याची लांबी आहे १६२० फूट. दोन पहाडांवर वसलेली जमेंट व ग्रेशेन ही दोन गांवे यामुळे जोडली जाणार आहेत. हा पूल जमिनीपासून २७८ फूट उंचीवर आहे. पूर्वीही येथे पूल होता मात्र दरड कोसळल्याने तो बंद केला गेला. हा भाग सतत दरडी कोसळणारा आहे. त्यामुळे नव्या पुलाला २ इंची जाडीच्या दोन भक्कम केबल्सचा आधार दिला गेला असून त्यांचे वजन आहे ८ टन.

या पुलाखाली ग्राबेग्युफर दरी आहे. नवा पुल जुन्या पुलापेक्षा ६५० फूट खाली तयार केला गेला आहे व तो फक्त दोन फूट रूंदीचा आहे. त्यामुळे हायकर्सना दरी पार करताना पुन्हा चढण चढावी लागणार नाही. पादचार्‍यांसाठीचा हा आत्तापर्यंतचा सर्वात लांब पूल आहे मात्र सर्वाधिक लांबीचा पूल जपान येथे आहे. कोबे अकाशी नावाचा हा पूल ६५३२ फूट लांबीचा असून त्यावरून वाहने जाऊ शकतात.

Leave a Comment