नाशकात येणार नवा रेल्वे कारखाना


नाशिकमध्ये लवकरच रेल्वेचा नवा कारखाना सुरू केला जात असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. मेळा बसस्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याच्या योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले त्यानंतर प्रभू बोलत होते. प्रभू म्हणाले, एकलहरेतील रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे त्यात २० एकर जागेत ५२ कोटी रूपये खर्चून नवा कारखाना उभारला जात आहे. यात रेल्वेची चाके तसेच अॅक्सलचे उत्पादन केले जाईल. या मुळे ५ हजार जणांना रोजगार मिळू शकणार आहे.

या नव्या कारखान्यामुळे चाके व अॅक्सलसाठी आऊटसाअर्सिंग करण्याची गरज संपेल व उत्पादन खर्चात बचत होईल असेही प्रभू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले देशात रेल्वे स्थानके पुनर्विकास योजना राबविली जात असून त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयी उपलब्ध हेातील. मुंबई व परिसरातील ३६ स्थानकांचा या योजनेत समावेश आहे. या स्टेशनवर प्रवाशांना दैनंदिन गरजाच्या सर्व वस्तू मिळतील तसेच नाशिकच्या शेतकर्‍यांच्या भाज्यांचे स्टॉलही येथे लावले जातील. डिसेंबरपासून रेल्वेचे जाळे वाढविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.यात प्रवाशंासाठी पंचतारांकित हॉटेल्स, कांही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण, पुणे नाशिक जोडण्यासाठी सर्वेक्षण यांचाही समावेश आहे.

Leave a Comment