अमेरिकन दूरसंचार आयोगाने अॅपलला फाईव्ह जी नेटवर्क टेस्टींगसाठी परवानगी दिली असून अॅपलने हे वेगवान नेटवर्क सर्व ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. अॅपल सर्वप्रथम कॅलिफोर्नियातील दोन जागांवर ऑगस्ट २०१८ मध्ये फाईव्ह जी टेस्टींग सुरू करत आहे. फेसबुक, गुगल, सॅमसंग, स्पिरींट या कंपन्याही या नेटवर्कसाठी प्रयत्नशील आहेत तसेच एटी अॅन्ड टी व व्हेरीझोन कंपन्यांही फाईव्ह जीवर काम करत असल्याचे समजते.
अॅपलला फाईव्ह जी नेटवर्कसाठी परवानगी
अॅपलने फाईव्ह जी नेटवर्कसाठी हाय फ्रिक्वेन्सी वेब ब्रॉडबँड व छोट्या वेबलेंथ बँडवर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. हाय फ्रिक्वेन्सी बँडवर हेवी डेटा वेगाने पाठविता येतो मात्र त्यावेळी मार्गात कोणताही अडथळा नसावा लागतो. स्पिरींट २०१९ पासून फाईव्ह जी सेवा सुरू करणार असल्याचे तसेच टी मोबाईल ही सेवा २०२० पासून देणार असल्याचे सांगितले जात आहे.