भारतीय रेल्वेत एसी डब्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या ब्लँकेटच्या स्वच्छतेवरून नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी टीका केली आहे. त्यानंतर रेल्वे खाते सक्रिय झाले असून आता एसी डब्यांमध्ये ब्लँकेट देणे पूर्णपणे बंद करण्याचा विचार रेल्वे करत आहे. याशिवाय डब्यातील तपमान 19 डिग्रीवरून 24 डिग्री करण्याचाही विचार रेल्वे करत आहे.
एसी डब्यात आता मिळणार नाही ब्लँकेट ?
रेल्वेत एका ब्लँकेटच्या धुलाईचा खर्च55 रुपये एवढा होतो, मात्र रेल्वे प्रवाशांकडून फक्त 22 रुपये घेते.
ब्लँकेटच्या धुलाईवर रेल्वेला खूप खर्च करावा लागतो. तरीही ब्लँकेट कधी-कधी नीट स्वच्छ होत नाहीत. त्याची तक्रार प्रवाशी करतात. हे ब्लँकेट फक्त वातानुकूलित वर्गातील प्रवाशांना दिले जातात. त्यामुळे वातानुकूलित वर्गातील थंडी कमी करावे, जेणेकरूनम प्रवाशांना ब्लँकेटची गरज पडणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
रेल्वे मंत्रालय दोन पर्यायांचा विचार करत आहे. यातील एका पर्यायानुसार वातानुकूलित डब्यांतील तपमान वाढविण्यात येईल. दुसऱ्या पर्यायानुसार ब्लँकेटऐवजी कव्हर दिले जाईल कारण ब्लँकेटच्या तुलनेत कव्हरची धुलाई सोपी आहे, असे सूत्रांनी सांगितले.