२०००च्या नोटा चलनात कायम राहणार – अर्थ राज्यमंत्री


नवी दिल्ली – २०००च्या नोटा बंद होणार असल्याच्या बातम्या काही दिवसापासून आपल्या कानांवर पडत आहेत. पण आता केंद्र सरकारने २०००च्या नोटा चलनात कायम राहणार असल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी दिली.

सरकारचा २०००च्या नोटा बंद करण्याचा असा कोणताही निर्णय नाही. या नोटांची छपाई कमी करायची ही वेगळी बाब आहे. याबद्दल आरबीआय चौकशी करेल आणि २०००च्या नोटांचा निर्णय़ही घेईल असे गंगवार यांनी सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांपासून २००च्या नोटांची छपाई सुरू आहे. त्या लवकरच चलनातही येतील. २००च्या नोटा चलनात आणून कमी मुल्याच्या चलनाची यापुढे वाढ होईल असेही गंगवार यांनी सांगितले आहे.

२०००च्या नोटांची छपाई गेल्या काही दिवसांपासून सरकारने थांबवली असल्याची चर्चा सुरू होती. नोटा छपाईवर संसदेतही चर्चा झाली. विरोधकांनी २०००च्या नोटांची छपाई बंद केली का ? असा सवाल अर्थमंत्री अरूण जेटलींना केला होता. मात्र त्यावेळी जेटलींनी उत्तर दिले नव्हते.

Leave a Comment