व्हॉट्सअॅपवर आताच्या घडीला प्रत्येकजण चॅटींग करताना आपल्याला पहायला मिळतो. अनेकदा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जीआयएफ म्हणजेच (GIF) इमेजेस बनविण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात या GIF फाइल्स वापरण्यात येत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. यूझर्स आपल्या भावना GIF फाइल्सच्या माध्यमातून मेसेजेसमध्ये स्पष्ट करु शकतात. अनेक प्रकारच्या GIF फाइल्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण आता तुम्हाला स्वत:ला GIF फाइल बनवायची असेल तर कंपनीने त्यासाठी एक टूल सादर केले आहे. तुम्ही या टूलचा वापर करुन कुठल्याही मोबाईल अॅपचा वापर न करताही GIF फाइल बनवू शकता.
आता कुठल्याही अॅपविना स्वत:च बनवा GIF ईमेज
GIF Maker नावाने Giphy ने जिफ क्रिएशन टूलला सादर केले आहे. यूझर्स याच्या माध्यमातून आपल्या मोबाईल फोनमधून थेट कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन GIF फाइल बनवू शकता. यानंतर यूझर्सला कुठल्याही अॅपची गरज पडणार नाही.
ट्विटरच्या माध्यमातून Giphy ने आपल्या नव्या टूलची माहिती दिली आहे. ट्विट करत कंपनीने लिहिले आहे की, “#MobileGIFMaker आले आहे. कंपनीने यासोबतच एक लिंक उपलब्ध करुन दिली आहे जी कंपनीच्या वेबसाईटची आहे. याच्यामाध्यमातून तुम्ही अगदी सहजच Giphy वेबसाइटवर जाऊन GIF क्रिएट करु शकता.
तुम्हाला GIF बनविण्यासाठी Giphy app वरुन व्हिडिओ आणि फोटोज घ्यावे लागतील आणि त्यानंतर आपल्या कॅपरा रोलमधून इमेज पेस्ट करावी लागणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही थेट वेबसाईटवरुन व्हिडिओचे युआरएलही पेस्ट करु शकता. यूझर्स यामध्ये टेक्स्ट, स्टिकर आणि काही अॅनिमेशन सुद्धा अॅड करु शकतात.
"Giphy GIF Maker Lets Mobile Web Users Create GIFs Without an App" via @Adweek https://t.co/CG8SchELO0 pic.twitter.com/zkdXJMIQLS
— GIPHY (@GIPHY) July 26, 2017