हॉट एअर बलूननेच गाठता येते काप्पादोचा


तुर्कस्तानाची राजधानी इस्तंबूल पासून साधारण ७५० मैलांवर असलेल्या काप्पादोचा या भागात जाण्यासाठी अनेक पर्यटक उत्सुक असतात कारण येथे एक जादूई जग वसले आहे. येथे जाण्यासाठी बस, ट्रेन कार चा प्रवास खडतर आहे पण येथे हॉट एअर बलूनमधून जाता येते व पर्यटक हा थरार अनुभवण्यासाठी प्रचंड गर्दीही करतात.

काप्पादोचा हा तुर्कस्तानातील दुर्गम असा भाग आहे. येथे ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे बनलेले पठार आहे तसेच अनेक डोंगर, कडे कपार्‍याही आहेत. या डोंगरातूनच गेली कित्येक वर्षे मानवी वस्ती आहे. येथली घरे म्हणजे डोंगरांच्या घळीतल्या गुहाच.हा परिसर प्राचीन असून त्याला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे. या भागात रस्ते बनविणे अतिशय अवघड काम आहे कारण हा संपूर्ण भाग पहाडांच्या मध्ये वसलेला आहे. जगात या प्रकारचा हा एकमेव भाग आहे.


हॉट एअर बलून मधून येथे जाताना खालची भूमी चंद्रावरची असावी असा भास होतो. डोंगरांच्या मध्ये असलेली मोठमोठी रिसॉर्ट बाहेरून दिसत नाहीत. जादूई निसर्गदृष्ये डोळ्याचे पारणे फेडतात त्याचवेळी पक्ष्यासारखे विहरत या भागावरून उडताना थरारही अनुभवता येतो. वरून या घरांची किवा रिसॉर्टची छोटी छोटी धुराडी या निसर्गदृष्याला चार चाँद लावतात. येथली सगळी वस्ती भूमिगत आहे. घरे किवा हॉटेल म्हणजे एकमेकांना जोडलेल्या खोल्या. कधी त्यासाठी बोगद्यातून जावे लागते तर कधी एकच माणूस एकावेळी जाऊ शकेल अशा घळीतून जावे लागते.

ही भूमी अतिशय सुपीक अ्राहे त्यामुळे येथे फळे, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो. विशेषत द्राक्षे खूपच प्रसिद्ध आहेत. हॉट एअर बलूनसाठी सूर्योदयापासून उड्डाणे सुरू होतात. इच्छा असल्यास गुहांतील मस्त हॉटेल्समध्ये मुक्काम करता येतो अन्यथा सूर्यास्ताला परत येता येते.

Leave a Comment