भारतातील चहा मळे दुरावस्थेत


जगभरात चहा उत्पादनात भारताने मिळविलेले यश व प्रसिद्धी धोक्यात आली असून देशातील १४१३ हजार चहामळ्यांपैकी १८ टक्के मळे दुरावस्थेत असल्याचे टी बोर्ड ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. परिणामी भारतीय चहाच्या प्रसिद्धीस गालबोट लागण्याची भीती व्यकत केली जात आहे. हे सर्व मळे आजारी घोषित करण्यात आले असून चहा मळे मालकांना तातडीने त्यासंदर्भात पावले उचलण्याचा सल्ला टी बोर्डने दिला आहे.

या मळ्यात आसाम, प.बंगाल मधील ११६ चहा बागांच्या मालकांचा समावेश आहे. त्यांना परिस्थितीत तत्काळ सुधारणा करण्याविषयी सांगितले गेले आहे. यात दार्जिलिगच्या तीन चहामळ्यांचाही समावेश आहे. अन्यथा चहा उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होणार असल्याचे टी बोर्डचे म्हणणे आहे. दरवर्षी भारतातून ९ लाख टनांहून अधिक चहा उत्पादन होते व भारत यात जगात दोन नंबरवर आहे.

आजारी चहामळ्यात आसामातील ७४५ पैकी ८८, प.बंगालमधील ३७७ पैकी ६५ व तमीळनाडूमधील ११७ पैती ३१ मळ्यांचा समावेश आहे.दार्जिलिगचा चहा जगप्रसिद्ध असून काही मळ्यातील चहा फक्त निर्यातच केला जातो यातील ३ मळे आजारी घोषित केले गेले आहेत. या ठिकाणी मजुरांच्या समस्या आहेत असे समजते.

Leave a Comment